
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
विवाहित तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत आश्लिल व्हिडीओ काढून त्या व्हिडीओच्या सहाय्याने बदनामी करण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे.
या घटनेतील आरोपी रवी बर्डे, रा. डिग्रस या तरूणाचा विवाह झालेला आहे. पहिली बायको असताना देखील त्याने अल्पवयीन मुलीसोबत वेळोवेळी नैसर्गीक व अनैसर्गीक शारीरिक संबंध केले. आरोपी रवी बर्डे याने शारीरिक संबंध ठेवतेवेळी त्याचा व्हिडीओ तयार केला. नंतर त्या व्हिडीओच्या आधारे त्या पीडित मुलीची बदनामी करण्याची धमकी देवून तिचेसोबत लग्न न करता एकत्र राहत आहे. मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी रवि गिताराम बर्डे, रा. डिग्रस, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा भादंवि कलम 376 (2) (एन) 377, 504 प्रमाणे बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासृन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 (एल), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.