अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले

परस्पर विरोधी फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा
अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अश्लील गाणी (Obscene Songs) वाजवण्यावरून मंगलगेट (Mangal Gate) परिसरातील दाणे डाबरा येथे दोन गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री हाणामारी (Two Group Fight) झाल्याची घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले
‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज !

मंगलगेट येथील वर्चस्व ग्रुपच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर राजू मुर्तोडकर (रा. वंजार गल्ली, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंजित तरुण मंडळाचे सचिन तुकाराम जाधव, प्रशांत ऊर्फ रॅनबो काळे, वैभव काळे, सुरज काळे, सचिन राऊत, महेश बेद्रे, रोहीत पाथरकर व इतर १० ते १२ यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले
पैशासाठी 9 महिन्यांपूर्वी आईचाही केला खून

रंजीत तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बापू काळे (रा. मंगलगेट, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर मुर्तोडकर, सनी ऊर्फ श्रीकांत मुर्तोडकर, प्रथमेश थोरात, भैया थोरात, विठ्ठल उप्पळकर, सुमित सुरसे, अमित सुरसे, ललीत चवालीया व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

अश्लील गाणी वाजवण्यावरून दोन मंडळाचे कार्यकर्ते भिडले
भागीदारीमधील फर्मचे दीड कोटी हडपले
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com