ओबीसी आरक्षण प्रश्‍नी भाजपाचा नेवासाफाटा येथे रास्तारोको

ओबीसी आरक्षण प्रश्‍नी भाजपाचा नेवासाफाटा येथे रास्तारोको

नेवासाफाटा (वार्ताहर) - ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपच्यावतीने शनिवारी सकाळी 11 वाजता नेवासाफाटा येथे रास्तारोकोद्वारे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, नेवासा नगरपंचायतचे नगरसेवक सचिन नागपुरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

या आंदोलनामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे, नामदेव खंडागळे, युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, प्रदीप ढोकणे, ज्ञानेश्‍वर पेचे, दत्तात्रय पोटे, जिल्हा सरचिटणीस अंकुश काळे, भाऊ नगरे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसींचे आरक्षण त्यांच्या हक्काचे असून ते त्यांना मिळालेच पाहिजे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नसल्याने महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर यांनी निषेध केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com