ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यात 26 जूनला चक्काजाम आंदोलन

राम शिंदे : आघाडी सरकारवरील विश्वास उडाला
ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यात 26 जूनला चक्काजाम आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकाआघाडी सरकारवरील विश्वास उडाला आहे. या सरकारची भावना व दृष्टीकोन ओबीसींच्या संदर्भात चांगला नाही. यामुळे लोकशाही मार्गीने आम्ही रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरून ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करू, भारतीय जनता पार्टीच्या वतीने 26 जून रोजी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी भाजपाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी माजी आ. शिवाजी कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. ते आंदोलनाच्या भूमिकेत आहे.

ते स्वत: बैठका घेतात, मोर्चे काढतात त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थपित होईल, यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारने ओबीसींवर अन्याय केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. मागसवर्गीयांच्या पदोन्नतीवर अन्याय केला आहे. शेतकर्‍यांना काही मिळाले नाही. सरकारविषयी सर्वत्र नाराजी आहे. ओबीसींचे आरक्षण जोपर्यंत पुनर्स्थपित करत नाही, तो पर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेऊ नये, अशी आमची मागणी असून यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com