राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नगरमध्ये चक्काजाम

ओबीसी आरक्षण स्थगिती उठवल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नगरमध्ये चक्काजाम

अहमदनगर (प्रतिनिधी)-

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने (Rashtriya Samaj Party) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्याच्या निषेधार्थ स्टेट बँक चौक (State Bank Chowk) येथे चक्काजाम आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंधारे, माणिकराव दांगडे, सय्यदबाबा शेख, गंगाधर कोळेकर, मेजर हाके, सुवर्णाताई जहाड, गोरख वाडतके, डॉ सुनील चिंधे, संदीप कादळकर, शहाजी कोरडकर, मंदाकिनी बडेकर, रमाजी केमकर, माणिकराव शिंदे, भगवान करवर, अमोल शर्माळे, विनायक नजन, बाजीराव लेंडाळ, मीनाताई राहिंज, राजेंद्र महारले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राज्य सरकारने आवश्यक न्यायालयीन बाबीची वेळेत पूर्तता केलेली नाही. परिणामत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण तीन अटीची पूर्तता करेपर्यंत ही स्थगिती केलेली आहे. यामुळेच राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन व चक्काजाम आंदोलन करत आहे. राज्य सरकारने ओबीसी इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबीच्या पूर्ततेसाठी काम सुरू करण्यात यावे व ओबीसी समाजाचा ईपरीकल अनुभवा लिखित डाटा माहिती तातडीने जमा करून न्यायालयात द्यावा. तसेच ओबीसी आरक्षण ही स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com