ओबीसी आरक्षणाबाबत भाजपकडून अपप्रचार

राष्ट्रवादीकडून निषेध, तहसीलदारांना निवेदन
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपकडून अपप्रचार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, तसेच भाजपकडून ओबीसी आरक्षणा विषयी चाललेला अपप्रचाराविरूद्ध आ. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व नायब तहसीलदार गणेश आढारी यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवाध्यक्ष विक्रम कळमकर, महिलाध्यक्षा सुवर्णा धाडगे, महिला युवती अध्यक्षा पुनम मुंगसे, गंगाराम बेलकर, किसनराव रासकर, सतीष भालेकर, बाळासाहेब पोटघन, जितेश सरडे, राजश्री कोठावळे, विजय डोळ, शरद पवार आदी उपस्थित होते.

यावेळी आ. लंके म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात वेळकाढूपणा व निष्काळजीपणा केल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. मात्र अपप्रचार भाजपकडून केला जात आहे. यासाठी उपयुक्त असणारा ईम्पेरिकल डेटा केंद्र सरकारकडे उपलब्ध असताना, राज्य सरकराने वेळोवेळी मागणी करूनही तो दिला नाही. डेटा राज्य सरकारकडे असता तर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे सोयीचे झाले असते. केंद्र सरकारकडे असलेला ईम्पेरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा. भाजपने अपप्रचार थांबवावा. ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com