ओबीसी राजकीय आरक्षण, भाजपची निदर्शने

ओबीसी राजकीय आरक्षण, भाजपची निदर्शने

अहमदनगर (प्रतिनिधी)

ओबीसी राजकीय आरक्षणाचा (OBC political reservatio) मुद्दा प्रलंबित असतांना सहा जिल्ह्यात निवडणुका (Election) जाहीर झाल्या. हा राज्य सरकारचा (State Govt) नाकर्तेपणा आहे, असा आरोप करून या निवडणुका पुढे ढकलाव्या, या मागणीसाठी भाजपने (BJP) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector's Office) निदर्शने केली.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष सुनिल रामदासी, शिवाजी दहिंडे, नगरसेवक रविंद्र बारस्कर, मंडल अध्यक्ष अजय चितळे, संजय ढोणे, सचिन पारखी, संदिप मुनोत, विनोद भिंगारे, सुमित बटुळे, चंद्रकांत पाटोळे, सुनिल कुलकर्णी, विक्रम शिंदे, वसंत राठोड, शशांक कुलकर्णी, सचिन पालवे, संतोष गांधी उपस्थित होते.

भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे म्हणाले, सहा जिल्ह्यातील निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत आहेत, हा आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा आहे. आघाडी सरकारने वेळीच इंपिरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती.

आघाडी सरकारने ओबीसींच्या हक्कावर गदा आणणण्याचे काम केले आहे. आज ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. उद्या इतरही क्षेत्रातील आरक्षण रद्द केले जाईल. असे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप सुनिल रामदासी यांनी केला. ज्ञानेश्वर काळे, अ‍ॅड.अभय आगरकर, चंद्रकांत पाटोळे यांनी भुमिका मांडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com