ओबीसी जागा खुल्या वर्गासाठी, पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

ओबीसी जागा खुल्या वर्गासाठी, पारनेर, कर्जतसह अकोले, शिर्डीत उद्या फेरसोडत

अकोले, शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

अकोले, शिर्डी, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने ओबीसींच्या आरक्षीत असलेल्या जागा आता खुल्या प्रवर्गासाठी होत आहेत. त्यामुळे या जागेतील सर्वसाधारण/सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवावयाच्या जागांसाठी उद्या गुरूवार दि. 23 डिसेंबर 2021 रोजी सुधारित फेरसोडत होत आहे.

या नगरपंचायतींसाठी प्रत्येकी 4 जागा ओबीसींसाठी आरक्षीत होत्या. पण आता या जागांवर खुल्या प्रवर्गातील पुरूष 2 आणि महिलांसाठी दोन जागा येणार आहेत.

दरम्यान शिर्डीमध्ये पेच निर्माण झाला आहे. शिर्डी नगरपंचायत नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी शिर्डीकरांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर नगरपरिषद करण्याची घोषणाही करण्यात आली. पण नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या दरम्यान दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. हे दोनही उमेदवार बिनविरोध होणार आहेत. काल येथे मतदान झाले नाही. आता शिर्डीतील ओबीसींच्या चार जागा खुल्या प्रवर्गासाठी होत आहे. त्याचे सुधारित फेरसोडत होत आहे. त्यानंतर या जागांची निवडणूक होणार आहे. या जागांवरही शिर्डीकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com