ओबीसी, धनगर आणि नाभिक समाजाचे आंदोलन सुरूच

ओबीसी, धनगर आणि नाभिक समाजाचे आंदोलन सुरूच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाज तसेच ओबीसी, धनगर समाज आरक्षणानंतर आता नाभिक समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला आहे. धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे तर नाभिकांचे नगर शहरात उपोषण सुरू आहे. दोन्ही ठिकाणी राजकीय नेते आणि राज्यभरातून समाज बांधव भेटी देत असल्याने आंदोलन व्यापक होत आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका दोन्ही ठिकाणी घेतली असल्याने आता सरकार याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ओबीसींचे नागपूर व अन्य ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी ओबीसी आंदोलकांची मागणी आहे

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकूम काढावा, या मागणीसाठी सहा सप्टेंबरपासून यशवंत सेनेच्या वतीने चौंडीत उपोषण सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. बाळासाहेब दोडतले व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, वेळ पडली तर अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत मरण पत्कारू, असा आंदोलकांनी इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com