ओबीसी समाजाचा विश्वासात करणार्‍या आघाडी सरकार विरोधात भाजपचे आंदोलन

ओबीसी समाजाचा विश्वासात करणार्‍या आघाडी सरकार विरोधात भाजपचे आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ओबीसी समाजाचा (OBC Community) विश्वासघात करून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) घालविणार्‍या आघाडी सरकारच्या (Aghadi Government) विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा (BJP OBC Morcha) तर्फे आंदोलन (Movement) करण्यात आले.

गेले सहा महिने आघाडी सरकार (Aghadi Government) ओबीसी समाजाच्या (OBC community) राजकीय आरक्षणाबाबत (Political Reservation) टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा (Imperial data of the OBC community) गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत असा आरोप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस भारत गवळी (Bharat Gavali) यांनी केला.

इम्पिरीकल डेटा (Imperial Data) गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self-Governing Bodies) निवडणुका जाहीर (Election Announced) होण्यात झाला आहे, असा आरोप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत (Allegations OBC Morcha District Vice President Deepak Bhagat) यांनी केला.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणार्‍या महापालिका (Municipal Corporation), नगरपालिका (Municipality), जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण (Zilla Parishad Election Reservation to OBC Community) न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची (OBC reservation in the Supreme Court) बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे. विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणार्‍या ज्येष्ठ नेते शरद पवार (Senior leader Sharad Pawar) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही असा आरोप तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, आणि शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी केला.

ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍या आघाडी सरकारच्या विरोधात यावेळी तहसीलदार संगमनेर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते राम जाजु, सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, नगरसेविका मेघाताई भगत, संपत गलांडे, शिरीष मुळे, श्रीराज डेरे, सतिश कानवडे, हरिष चकोर, दिनेश सोमानी, ज्ञानेश्वर कर्पे, सिताराम मोहारीकर, वैभव लांडगे, संजय नाकिल, शिवकुमार भंगिरे, कल्पेश पोगुल, केशव दवंगे, प्रशांत वाडेकर, बालाजी लालपोतु, अमोल रणाते, संतोष पठाडे, विकास गुळवे, अरुण थिटमे, कोंडाजी कडनर, माधव थोरात, बाळासाहेब गोसावी, संतोष भालसिंग, भगवान कुक्कर, दादा गुंजाळ, प्रमोद ढवळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com