Video : साईबाबा संस्थान रुग्णालयात परिचारिका दिनी काम बंद आंदोलन

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Video : साईबाबा संस्थान रुग्णालयात परिचारिका दिनी काम बंद आंदोलन

शिर्डी | Shirdi

साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व परिचारक यांनी संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जागतिक परिचारिका दिनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या कंत्राटी आरोग्य सेवकांचे काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थानकडे साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय व साईनाथ रुग्णालय असे दोन स्वतंत्र रुग्णालय आहेत. या दोन्ही रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेत असलेल्या इंसोर्स व आउटसोर्स परिचारक व परिचारिका यांनी आज (१२) मे रोजी जागतिक परिचारिका दिनी आपल्या विविध मागण्यांसाठी साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय समोर कामबंद आंदोलन केले. 'संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे किंवा आरोग्य सेवेतील कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान ४४ हजार ९०० रुपये वेतन द्यावे,' अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, 'करोना महामारीच्या या साथ व संसर्गजन्य आजारात आणि जीवाची पर्वा न करता काम करत असून आम्हाला कुबेर अथवा इतर आजाराचा संसर्ग झाल्यास बाहेरील हॉस्पिटल उपचाराची व मेडिकेशन गरज पडल्यास तेथील बिलाचा परतावा मिळावा, आठवडा सुट्टी व्यतिरिक्त किमान चार पगारी सुट्ट्या लागू कराव्यात या मागण्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी संस्थांकडे संस्थांकडे केल्या.

परिचारिका व परिचारक यांनी केलेले आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करीत असताना पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक, हमरीतुमरी झाल्याचं यावेळेस पाहायला मिळाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com