रेमडेसिवीर इंजेक्शनवर आता रुग्णाचे नाव

जिल्हा प्रशासनाचा निर्णय : रुग्णालयांना इंजेक्शनच्या वापरानंतर व्हाईल ठेवावी लागणार जपून
रेमडेसिवीर इंजेक्शनवर आता रुग्णाचे नाव

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाच्या वाढत्या प्रकोपात अत्यावस्थ रुगणांवर उपचार करण्यासाठी रेमडसिवीर या इंजेक्शनचा वापर करण्यात येत आहे. मात्र, सध्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि गरजवंत रुग्णांपर्यंत हे इंजेक्शन पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधीत रुग्णांचे नावे इंजेक्शनवर मार्कर पेनने टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबतचे आदेश शुक्रवार जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. यात जिल्ह्यात करोनामुळे प्रभावित रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचे मार्गदर्शक सुचनानूसार आता करोना उपचार करणार्‍या रुग्णालयांना गंभीर करोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी दररोज सकाळी 9 पर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या संकेतस्थळावर संबंधीत रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांचे सही व शिक्यानिशी रुग्णालयाचे अधिकृत संकेत स्थळावरून इंजेक्शनची मागणी करावी लागणार आहे.

या मागणीनूसार प्राधान्य क्रमाने जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी यांचेमाफत छानणी करुन त्यांचे शिफारशीनुसार जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार्‍या रेमडिसिवीर इंजेक्शन साठ्याच्या व रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येेणार आहे. ज्या रुग्णालयाचे स्वत:चे मेडिकल नाहीत, अशांना जवळच्या मेडिकलमधून हे इंजेक्शन मिळवून देण्यात येणार आहेत. यात संबंधीत रुग्णांचे नाव इंजेक्शनवर मार्कर पेनने लिहून रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच औषधांचा वापर करुन झालेनंतर रिकाम्या व्हाईल संबंधीत रुग्णालयांना जतन करुन ठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तपासणीसाठी येणार्‍य भरारी पथकांना त्या रिकाम्या व्हाईल उपलब्ध द्यावे लागणार आहेत. संबंधीत रुग्णांच्या रुग्णालयातील डिचार्जनंतर त्या व्हाईलची विल्हेवाट लावावी लागणार आहे. अर्धवट माहितीच्या आधारे इंजेक्शनची माहिती मागविणार्‍या इंजेक्शन न मिळाल्यास त्याची जबाबदारी संबंधीत रुग्णालयावर राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आह.

................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com