आता पेट्रोलपंपावर देखील गर्दी

आता पेट्रोलपंपावर देखील गर्दी

सुपा (वार्ताहर) -

लॉकडाऊन काळात संचार बंदी कडेकोट होण्यासाठी पेट्रोलपंप धारकांना वेळेची कालमर्यादा ठरवून दिल्याने या ठराविक काळात इंधन भरण्यासाठी वाहन चालक गर्दी करत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व वाढता समूह संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने 15 एप्रिल पासून संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात मेडिकल व रुग्णालये वगळता सर्वच बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यात जिवनावश्यक वस्तू म्हणजे किराणा दुकाने डेअरी,बेकरी,भाजीपाला ,इंधन यांना सकाळी सात ते आकरा या वेळेत व्यवसाय करण्यास सवलत देण्यात आली आहे , यात अत्यावश्यक वाहने सोडता इतर वाहनांना दिवसभर इंधन देण्यास बंदी घातली आहे ,

सर्व प्रकारच्या वाहनांना इंधनासाठी सकाळी सात ते अकरा ही वेळ ठरवून दिली आहे . त्यामुळे मोटारसायकल चालक, दुध वाहतूक करणारी शेती व्यवसाय करणारी वाहने सकाळी सकाळी इंधन भरण्यासाठी गर्दी करत आहेत सुप्यात औद्योगिक वसाहतीमुळे घरगुती व व्यावसायिक वाहनांची संख्या मोठी आहे . त्या औद्योगिक वसाहतीतील कामगारांची संख्या लक्षणीय आहे .इंधन भरण्याच्या ठराविक वेळेमुळे या कामगारांची थोडी धावफळ होते तर शेतकरी व दूध वाहतूक करणारांना सकाळी सकाळी रांगेत उभे राहावे लागत आहे. एकंदरितच करोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधांची आवश्यकता आहेत यात विनाकारण फिरणारांसाठी ठराविक वेळेतच इंधन देणे हा एक चांगला प्रयत्न आहे ,यात जरी काही गरजवंतांची थोडी तारांबळ होत असली तरी ते आवश्यक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com