कुख्यात सुभाष माळी जेरबंद

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे हस्तगत
कुख्यात सुभाष माळी जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गेल्या सात वर्षापासून फरार असलेला कुख्यात गुंड, वाळु तस्कर सुभाष साहेबराव माळी यास राहुरी तालुक्यातील बारागांव नांदुर येथून राहुरी पोलीसांनी सापळा लावुन गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसा सह केले जेरबंद केले आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सुभाष साहेबराव माळी हा त्याचे पत्नीला भेटण्यासाठी बारागांव नांदुर येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता. पोलिसांनी साधे वेशात तीन दिवसांपासून सापळा लावला असता आज मंगळवारी सायंकाळी 7 वा. सुमारास बारागांव नांदुर येथे आला असता सुभाष माळी यास झडप घालुन ताब्यात घेतले आहे.त्यांच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले असून राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, राहुरी पोलीस स्टेशनकडील पोसई सज्जनकुमार न हेडा, पोसई निरज बोकील, पोहेकाँ जायभाय, पोना अमित राठोड, पोकों आजिनाथ पाखरे, पोकों सचिन ताजणे, पोकाँ नदीम शेख, पोकों अमोल पडोळे, पोकाँ महेंद्र गुंजाळ, पोकाँ आदिनाथ चेमटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com