कार्यारंभ आदेशच नाही; तरीही रस्त्याचे काम पूर्ण

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरस यांची मागणी
कार्यारंभ आदेशच नाही; तरीही रस्त्याचे काम पूर्ण

खैरी निमगाव (वार्ताहर)

अनेक वर्षापासून वाताहत झालेल्या व आ. लह कानडे यांच्या व प्रयत्नातून मंजुर झालेल्या निमगाव खैरी जाफराबाद-नाऊर या अडीच कि. मी. रस्त्याचा कार्यारंभ आदेश नसतानाही संबंधीत ठेकेदाराने काम पूर्ण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तरी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस यांनी केली आहे.

यापूर्वी डांबरीकरण केलेले जि. प. सदस्या संगीता पवार यांच्या निधीतील ५६५ मीटर लांबीचे कामावर डांबराचा वरचा थर मारून संपूर्ण अडीच कि.मी. चे बील काढण्याची घाई संबधित ठेकेदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून करत असल्याने शासनाची फसवणूक होत आहे.

या अडीच कि.मी. रस्त्यासाठी सुमारे ४४ लक्ष रुपये तरतूद करून केलेल्या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. साईडपट्टीवर काही ठिकाणी अतिअल्प मुरूम टाकण्यात आला असून रस्त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी तरस यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता यांनी आपल्या लेखी पत्रातून ठेकेदाराला पावसाळ्यात काम करू नये, असे सांगितले असताना तसेच जिल्हा परिषद सदस्या संगीता पवार यांनी डांबरीकरण केलेल्या ५६५ मीटर रस्ता प्रस्तावीत नसतानाही या रस्त्यावर लेअर कसे मारले? याचा जाब पत्रातून विचारला आहे.

हा रस्ता दोन तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या कामाची चौकशी झाली संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, कारवाई न झाल्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तंटामुक्तीचे अध्यक्ष रामभाऊ तरस यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com