
सोनई |वार्ताहर| Sonai
नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनदादा गडाख मित्रमंडळ नेवासा तालुका आयोजित व बॉडीबिल्डिंग अँड मेन्स फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन अहमदनगर यांच्या सहकार्याने जगदंबा देवी मंदिर सोनई येथे आयोजित ‘उत्तर महाराष्ट्र नामदार श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील 147 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये मेन टायटल नामदार श्री चे विजेते दिपक डंबाळे यांना 31 हजार रु. रोख बक्षीस व आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेवासा तालुका श्री चे विजेते मयुर साळवे यांना 21 हजार रु. रोख व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट पोझर चे विजेते सोनु पवार 7 हजार रु. व बेस्ट इंप्रुव्हड्चे विजेते अश्विन पंचाळ यांना 5 हजार रु. रोख व सन्मानचिन्ह मुळा संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख व मित्र परिवाराच्या वतीने देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील विजेत्या 42 स्पर्धकांना रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच स्पर्धेमध्ये सहभागी सर्व शरीरसौष्ठव स्पर्धकांना मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उदयन गडाख, सरपंच धनंजय वाघ, अॅड. राज देवढे, उदय पालवे, महावीर चोपडा, असोसिएशनचे अध्यक्ष मयुर दरंदले, सचिव कैलास रनसिंग, उपाध्यक्ष सतिष रासकर, महेश गोसावी, लहू धनवटे, महावीर मेहेर आदींसह सर्व पदाधिकारी, अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या काळात ग्रामीण भागातील खेळाडूंना बॉडीबिल्डिंग या खेळाच्या प्रवाहात आणून हा खेळ खेड्यापाड्यातील खेळाडू पर्यंत पोहोचण्याचा काम संघटना अविरतपणे करत राहील असे संघटनेचे अध्यक्ष मयूर दरंदले यांनी सांगितले.
नामदार गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून देवसडे गावात व्यायाम शाळा साहित्य मंजूर झाल्याने आधुनिक पद्धतीच्या व्यायामामुळेच ‘नेवासा तालुका श्री’ हा बहुमान मिळवू शकलो.
- मयुर साळवे नेवासा तालुका श्री