
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचार्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जारी केल्याने शिक्षकेत्तर कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत.
कनिष्ठ लिपिक - आतापर्यंत 2000 दरम्यान वेतन त्यांना मिळत होतं मात्र यामध्ये वाढ झाली असून आता 10000 एवढे वेतन मिळणार आहे.
ग्रंथपाल - 1500 ते 2500 दरम्यान वेतन आतापर्यंत दिलं जात होतं मात्र आता 14000 रुपये वेतन मिळणार आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक - आतापर्यंत 2000 ते 2500 दरम्यान वेतन मिळत होतं मात्र यामध्ये वाढ झाली असून 12000 रुपये आता वेतन मिळणार आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी - या कर्मचार्यांना आतापर्यंत 1700 रुपये एवढं वेतन मिळत होतं मात्र आता 8000 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.