शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र राज्य अशासकीय अनुदानीत महाविद्यालयीन व अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात दि. 18 डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचा भाग असलेले लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी या महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सामील झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, 1 जानेवारी 2016 ते 31 ऑक्टोबर 2020 या 58 महिन्यांची थकबाकी शासकीय, निमशासकीय इतर विभागामधील पात्र कर्मचारी, तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कार्यरत अभिमत विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे, तंत्रज्ञान संस्था व त्यांच्या संलग्नित महाविद्यालयीन आणि अशासकीय अनुदानीत महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ज्याप्रमाणे देण्यात येणार आहे, त्याप्रमाणे अदा करण्यात यावी. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय त्वरीत निर्गमित करण्यात यावा. अकृषी विद्यापीठातील उर्वरित 796 पदांचा सातवा वेतन आयोगाच्या सुधारीत वेतन संरचनेचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणे.

शासन निर्णयानुसार तदर्थ पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांना पदोन्नती पदांचे निवृत्तीवेतन देण्यात यावे. 2005 नंतर नियुक्त कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्यास मंजुरी द्यावी. तसेच इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

प्रसिद्धी पत्रकावर मुख्य संघटक अजय देशमुख, डॉ. नितीन कोळी, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, रावसाहेब त्रिभुवन, प्रसाद राणे, आनंदराव खामकर, प्रवर्तक डॉ. दिनेश कांबळे, डॉ. प्रविण मस्तुद, मुरलीधर सातव, समन्वयक मिलींद भोसले, दीपक मोरे, प्रकाश म्हसे, विठ्ठल लांबे, दत्तात्रय कोहकडे, प्रफुल्ल तनपुरे, महेंद्र वने, आबासाहेब थोरवे, जगन्नाथ इंगळे, सुभाष जेजुरकर, अशोक बिडगर, ज्ञानेश्वर कपिले, दिगंबर जगधने, राजेंद्र जाधव, मनिषा मेहेत्रे, जालिंदर मुसमाडे, संजय गुलदगड, अमोल भालसिंग, उत्तम ठोकळे, तात्यासाहेब बडधे, संदिप निकम, राजेंद्र मोरे, संदिप खडके विशाल लोहार, लक्ष्मण जगधने, मनोज डोंगरखोस आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com