आयटी पार्कच्या विकासात कोणीही खोडा घालू नये - आ. जगताप

‘तो’ विषय अदखलपात्र
File Photo
File Photo

अहमदनगर | प्रतिनिधी

आयटी पार्क हा नगरच्या (Ahmednagar IT Park) तरूणांच्या भविष्याचा विषय आहे. अद्यापही तेथे मोठे काम होणे बाकी आहे. मात्र सवंग लोकप्रियतेसाठी आयटी पार्कच्या (IT Park) विकासात कोणी खोडा घालू नये, असे आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी म्हटले आहे. माझ्यावर आरोप करणारे अदखलपात्र आहेत. माझ्यासाठी आयटी पार्क हाच विषय अधिक महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगीतले.

कालपासून नगरमध्ये आयटी पार्क (IT Park Ahmednagar) हा विषय चर्चेत आला आहे. येथे तरूणांची मोठी फसवणूक झाली. ही फसवणूक आ.जगताप यांनी केली, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केला. याप्रकरणी शुक्रवारी आ.जगताप (MLA Jagtap) यांनी आपली भुमिका मांडली.

ते म्हणाले, आयटी पार्क हे येथील तरूणांचे स्वप्न आहे. अनेक वर्षे ही इमारत बंद होती. काँग्रेसचे तत्कालीन मंत्री स्व.पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या पुढाकारातून आयटी पार्क येथे साकारला होता. मात्र तो सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आयटी कंपन्या येथे आल्या. त्यातून अनेकांना रोजगार मिळाला. आजही आयटी पार्क पूर्णपणे विकसीत नाही. हे रोपटे भविष्यात नक्की वाढेल. मात्र आज आयटी पार्कमध्ये दहशत निर्माण करून वातावरण खराब केले जात आहे. यामुळे कंपन्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे घडल्यास नगरविषयी नकारात्मक भावना कंपन्यांमध्ये निर्माण होईल. याचा फटका रोजगाराला बसेल. याचे भान आरोप करणार्‍यांनी ठेवावे.

किरण काळे हा आपल्यासाठी अदखलपात्र विषय आहे, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. आयटी पार्क हा विषय माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्याच्या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आयटी पार्कच्या विकासासाठी प्रयत्न करणे, हे आमदार म्हणून माझे काम आहे. त्यामुळे आयटी पार्कच्या विषयावर उत्तरे देण्यासाठी तेथील उद्योजक आणि तंत्रज्ञ सक्षम आहेत, असेही ते म्हणाले.

किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, हा तक्रार करणारी महिला आणि पोलीस तपासाचा विषय आहे. माझा त्याच्याशी संबंध नाही. पोलीस योग्य तो तपास करतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com