नव्या ग्रीन फिल्ड महामार्गामुळे विकासाचा वेग वाढेल

नव्या ग्रीन फिल्ड महामार्गामुळे विकासाचा वेग वाढेल

अहमदनगर | प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला.

दरम्यान यावेळी नितीन गडकरी यांनी, ‘सुरत-नाशिक-अहमदनगर' या नव्या ग्रीन फिल्ड महामार्गामुळे विकासाचा वेग वाढेल. या हायवेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केलाय. त्याचबरोबर या हायवेमुळे नगर मुख्य प्रवाहात येईल, असे गडकरी यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.