निपाणी वडगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

निपाणी वडगाव येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील अनिल माधवराव गायकवाड (वय 40) यांनी आंब्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत कृष्णा सोन्याबापू गायकवाड (वय 19 रा. जिरेवाडी ,निपाणी वडगाव ,ता.श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 75/2021 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

अनिल गायकवाड यांनी कोणत्या कारणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. पवार हे पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com