निपाणी वडगाव येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

निपाणी वडगाव येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथा रेल्वे चौकी क्रमांक 47 जवळून रेल्वे लाईन ओलांडत असताना रेल्वेची जोरात धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. नरेंद्र गणपत गायधने (57, रा. निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल सकाळी 10 वाजून 45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात गायधने यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे तसेच नातेवाईकांना याची माहिती दिली. किरण किसन गायधने यांनी पोलीस ठाणे येथे कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बारशे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. शवविच्छेदनानंतर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नरेंद्र गायधने हे परिसरातील मंगल कार्यालयात व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहत होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, चुलतभाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. निपाणी वडगाव येथील गायधने वस्तीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com