वाढदिवसाच्या दिवशीच झोपेतच काळाने घातली झडप

वाढदिवसाच्या दिवशीच झोपेतच काळाने घातली झडप

निपाणी वडगाव परिसरात उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चालक ठार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये पहाटे साडे तीनच्या सुमारास ट्रॅक्टर जुगाड चालक ट्रॅक्टर खाली करण्यास वेळ असल्याने शेजारील जुगाड जवळ विश्रांतीसाठी झोपी गेला. जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना जुगाड ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. काल त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच काळाने झडप घातली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील कारखाना परिसरामध्ये जुगाड चालक या व्यक्तीला मयत नानासाहेब दगडू मेचे (वय 40) हे झोपलेले आहेत हे माहीत नव्हते. चालकाने जुगाड ट्रॅक्टर मागेपुढे घेताना सदर झोपलेल्या नानासाहेबाच्या अंगावरून जुगाड ट्रॅक्टर गेल्याने नानासाहेब मेचे हे जागीच ठार झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जुगाड ट्रॅक्टर चालकाने घटनेची माहिती शेजारचे वाहन चालक तसेच ग्रामस्थांना दिली.

यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मयत नानासाहेब दगडू मेचे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल याठिकाणी आणण्यात आला. नानासाहेब मेचे यांचे नातेवाईक यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड करत आहेत.

नानासाहेब दगडू मेचे हे रांजगणाव-अस्तगाव शिवारातील राहणारे असून काल त्यांचा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या दिवशीच पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास काळाने झडप घातली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com