निपानीनिमगाव येथे गावठी हातभट्टीवर छापा; एकावर कारवाई

File Photo
File Photo

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील निपानीनिमगाव येथे गावठी हातभट्टीची दारु बनवणार्‍या अड्ड्यावर छापा टाकून 300 लिटर दारुच्या रसायनासह गावठी दारु व साहित्य असा सुमारे 25 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने एकावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश आव्हाड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमवारी दुपारी 12 वजण्याच्या सुमारास उस्थळदुमाला ते निपानीमिगाव जाणार्‍या रोडने निपानीनिमगावकडे जाणार्‍या रोडलगतच्या ओढ्यामध्ये निपानीनिमगाव शिवारात मनोज उत्तम कसबे (वय 32) रा. निपानीमिगाव हा टिपाडाला जाळ घालत असताना दिसला. त्याला ताब्यात घेवून काय करत आहेस असे विचारले असता गावठी हातभट्टीची दारु तयार करत असल्याचे सांगितले.

त्याच्याकडून टिपाडातील एक बॅरल उकळते रसायन, प्लॅस्टीक टिपाडातील 300 लिटर कच्चे रसायन, तीन हजार रुपये किमतीची 30 लिटर गावठी हातभट्टीची दारु, तिन टिपाडे, एक अ‍ॅल्युमिनियम घमेले, तीन प्लॅस्टीक बकेट, 20 किलो लाकडे असा एकूण 24 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

त्याच्यावर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 972/2022 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(फ)(क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक अशोक कुदळे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com