अकोले तालुक्यात करोनाचा नववा बळी
सार्वमत

अकोले तालुक्यात करोनाचा नववा बळी

तालुक्यातील एकुण करोना बाधितांची संख्या ३२३

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले शहरासह तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असतांना करोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज कारखाना रोडवरील एका ७१वर्षीय वृद्धाचा करोना मुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा १५ ऑगस्ट रोजी करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्या वृद्धाला ञास होत होता. त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच आज बुधवारी पहाटेच त्यांचा मृत्यू झाला असल्याने त्याच्या रुपाने तालुक्यातील करोनाचा ९ वा बळी गेला आहे. 9th corona patient dead in akole taluka

तालुक्यातील एकुण करोना बाधितांची संख्या ३२३ झाली आहे. त्यापैकी २१८ व्यक्ती करोनामुक्त झाले. ९५ व्यक्तीवर उपचार सुरू आहे. दररोज नवीन गावात करोना चा प्रादुर्भाव होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com