निमगाव कोर्‍हाळे शिवारात विहिरीतील पाणबुडीची चोरी

निमगाव कोर्‍हाळे शिवारात 
विहिरीतील पाणबुडीची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

राहाता तालुक्यातील शिर्डी जवळच असलेल्या निमगाव कोर्‍हाळे गावातील गट नंबर 123/124 मध्ये जमीन असुन शेतातील विहिरीजवळ कोणीतरी वायरची छेडछाड करुन पानबुडीची चोरी केली.

तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे शिवारातील गट नंबर 123/124 मध्ये असलेल्या विहरीत सोडलेली 10 हजार रुपये किंमतीची पाणबुडी कोणीतरी अज्ञात चोरट्यान चोरुन नेली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भानुदास रावसाहेब कातोरे (वय 54) यांनी फिर्याद दिल्याने शिर्डी पोलिसांनी भादंवि 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे. ग्रामीण भागातील विहिरीवरून मोटारी पाणबुडी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी शिर्डी पोलिसांनी कठोरपणे कारवाई करुन अशा टोळ्यांना गजाआड करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी कातोरे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com