मोटारसायकल अपघातात तीन गंभीर जखमी

उपचारासाठी दोघांना नगरला हलवले
मोटारसायकल अपघातात तीन गंभीर जखमी

खैरी निमगांव | Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur) खैरी निमगांव (Khairi Nimgav) येथील हरेगाव कॉर्नरजवळ दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात (Motorcycle Accident) होऊन तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले. त्यांना उपचारार्थ श्रीरामपूर (Shrirampur) येथील साखर कामगार (Sakhar Kamgar Hospital) येथे दाखल केले. त्यानंतर त्यातील दोघांना उपचारासाठी नगरला (Nagar) हलवण्यात आले. श्रीरामपूरहून येणाऱ्या MH १५ GT ८६३१ बजाज सिटी १०० या गाडीने गोंडेगाव (Gondegav) येथील महावितरण कर्मचारी दादासाहेब थोरात आणी भाऊसाहेब थोरात हे MH१७ CN ६३३४ या हिरो स्प्लेंडर प्लसला श्रीरामपूरकडे जात असताना समोरासमोर धडक (Accident) दिली.

यामध्ये तिघेही गंभीर जखमी (Injured) झाले त्यांना उपचारार्थ साखर कामगार येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यातील दोघांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले. हरेगाव कॉर्नर (Haregav) या ठिकाणी तसेच त्यापुढे हायस्कुल असल्याने याठिकाणी गतीरोधकांची आवश्यकता आहे. तसेच श्रीरामपूर - पुणतांबा रस्ता वळणाचा असल्याने येथे दिशादर्शक फलक आहेत.

मात्र ते अनेक ठिकाणी झाडामुळे दिसत नाहीत. याबाबत बाधंकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. या अपघातप्रसंगी उपस्थीत प्रत्यक्षदर्शीमध्ये सुरु असलेल्या चर्चेतुन समजते की, या दोन गाड्यामध्ये एक मॅजीक गाडी होती. ति बाजुला होताच समोरासमोर हा अपघात घडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com