निमगाव खैरी येथे रस्त्यावर दूध ओतून राज्य व केंद्र सरकारचा निषेध

निमगाव खैरी येथे रस्त्यावर दूध ओतून राज्य व केंद्र सरकारचा निषेध

खैरी निमगाव |वार्ताहर| Nimgav Khairi

लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांची सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत दूध संघाकडून दुधाचे भाव 10 ते 15 रुपयांनी पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्री दर मात्र तसेच ठेवण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी निमगाव खैरी येथे श्रीरामपूर कोपरगाव राज्यमार्गावर दुध ओतून केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

दुधाचा उत्पादन खर्च व सध्याचा दर यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर व अन्य महागाई यामुळे शेतकर्‍यांना आपला प्रपंच चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावनेचा विचार करून सरकारने दुग्धव्यवसायाला साखर धंद्याप्रमाणे रेव्हेन्यू शेअरींग व किमान दर असे दुहेरी संरक्षण लागू करावे. तसेच दुधाला किमान 4 रुपये प्रति लिटर भाव द्यावा. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकर्‍यांना गुणवत्ताधारक बियाणे व खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी केल्या.

यावेळी शेतकर्‍यांच्यावतीने दिलेले मागण्यांचे निवेदन पोलीस कॉन्स्टेबल कराळे व गणेश शेंगाळे यांनी स्वीकारले. याप्रसंगी संतोष भागडे, रामभाऊ तरस, अण्णासाहेब कोठुळे, विकास कोठुळे, विठ्ठल उंदरे, महेश शेजुळ, दीपक बनकर, लक्ष्मण भगुरे, विकास शेजुळ, सचिन कालंगडे, विजय परदेशी, नितीन शिंदे, प्रकाश कालंगडे, आप्पासाहेब झुराळे, एकनाथ काळे, ध्रुव भागडे, बबन भगुरे, सुनील वांडेकर, अमोल पटारे, आकाश बुधे, अशोक काळे, संदीप पोकळे, किशोर तरस, सागर पटारे, स्वप्निल काळे, भालचंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर गवारे, दत्तात्रय कालंगडे, आबा काजळे, बाबासाहेब राहणे, कैलास झुरळे, विजय गायकवाड, अमोल भागडे, महेश तरस, पत्रकार साईनाथ बनकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com