निमगाव डाकू येथे ग्रामसेवकास मारहाण

निमगाव डाकू येथे ग्रामसेवकास मारहाण

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असलेले ग्रामसेवक महादेव सखाराम माने यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करणार्‍या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

संजय मद्रास काळे (रा. निमगाव डाकू) असे आरोपीचे नाव आहे. माने हे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत असताना संजय काळे दारूच्या नशेत तेथे आला. ‘माझ्या आईच्या नावावरील आमचे घराचा मला उतारा काढून द्या अशी मागणी केली व उतारा आत्ताच्या आत्ता आणि लगेच माझ्या हातामध्ये पाहिजे’ असे जोरात ओरडत म्हणाला.

त्यावर माने यांनी ‘रजिस्टरला नाव पाहून तुमचा उतारा काढून देतो’ असे समजावून सांगत असतानाच काळे याने शिवीगाळ करत माने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कार्यालयीन खुर्च्यांची मोडतोड केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेचा ग्रामसेवक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com