नगरजवळ एक कोटींचे स्टेडियम उभारणार

आ. नीलेश लंके यांची घोषणा
आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यात क्रिकेट खेळण्याची आवड असलेल्या तरुणाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या खेळाडूंसाठी निंबळक येथील एक कोटी रुपये किंमतीचे ग्रीन हिल स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा आ. निलेश लंके यांनी केली.

निंबळक (ता. नगर) येथे कै. संजय लामखडे व कै. विलासराव लामखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्याववतीने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. लंके म्हणाले, निंबळक येथे 30 ते 35 वर्षापासून दोस्ती क्रिकेट क्लब दिवाळीत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करत आहे. येथील मैदान हे खेळाडूंसाठी चांगले आहे. येथील स्पर्धेे जिल्ह्यातून संघ सहभागी होतात.

खेळाडूंची गैरसोय होत असल्यामुळे अजय लामखडे यांनी येथे स्टेडियमची मागणी केली होती. स्टेडियमसाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच स्टेडियमचे काम सुरु होणार आहे. या स्टेडियमचा तालुक्यातील खेळाडूंना क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी फायदा होणार आहे.

यावेळी लामखडे म्हणाले, निंबळक येथील क्रिकेट स्पर्धा या यूटयुबवर पाहण्याची व्यवस्था केली असून ही स्पर्धा सात दिवस सुरू राहणार आहे. जवळपास 60 संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पधेत प्रथम क्रमांक मिळवणार्‍या संघाला 55 हजार 555 रुपयांचे रोख व चषक, उपविजेतेपद मिळवणार्‍या संघाला 44 हजार 444 रुपयांचे रोख व चषक, तृतीय क्रमांक मिळवणार्‍या संघाला 33 हजार 333 रुपये रोख व चषक, चतुर्थ क्रमांक मिळवणार्‍या संघाला 22 हजार 222 रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द फायनल मॅच, मॅन ऑफ द सिरीज ला प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com