निंबळकचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन
निंबळकचा पाणीप्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निंबळक (Nimbalak) (ता. नगर) येथील पाणीसाठा (Water Storage) वाढवून मिळावा, या मागणीसाठी (Demand) आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State Aditi Tatkare) यांची भेट घेऊन चर्चा केली. पुढील आठवड्यात एमआयडीसीच्या (MIDC) अधिकार्‍यांसमवेत चर्चा करून पाण्याचा प्रश्न (Question of Water) कायमस्वरूपी सोडवू, असे आश्वासन मंत्री तटकरे (Minister of State Aditi Tatkare) यांनी दिले.

निंबळक (Nimbalak) येथे जवळपास 20 हजारांच्या पुढे लोकवस्ती आहे. एआयडीसीमुळे (MIDC) लोकवस्ती वाढत आहे. सध्याचा पाणीपुरवठा (Water supply) अतिशय कमी स्वरूपाचा आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ते 15 दिवसांनी पाणी मिळते. जलवाहिनी नादुरूस्त होणे, विजेचा प्रश्न (question of electricity) निर्माण झाला तर 20 दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

याबाबत सरपंच प्रियंका लामखडे (Sarpanch Priyanka Lamkhade) यांनी आ. लंके (MLA Nilesh Lanke) यांच्याकडे पाणी वाढवून मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या पत्राचा आधार घेत आ. लंके (MLA Nilesh Lanke), अजय लामखडे यांनी राज्यमंत्री तटकरे (Minister of State Aditi Tatkare) यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी पुढील आठवड्यात एमआयडीसीच्या (MIDC) अधिकार्‍यांसमवेत चर्चा करून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com