निळवंडेचे काम पूर्ण झालेले कालवे, वेड्या बाभळींनी वेढले

निळवंडेचे काम पूर्ण झालेले कालवे, वेड्या बाभळींनी वेढले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) दुष्काळी (Drought) टापुतील गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे (Nilwande Dam) काम झाले, मात्र कालव्यांच्या कामाना वेग नसल्यामुळे पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेड्या बाभळीनी वेढले आहेत. विषेश म्हणजे याच भागात आजपर्यंत कालव्यांची तिनदा कामे झाली आहेत.

पन्नास वर्षापूर्वी उत्तर नगर जिल्ह्यातील (Nagar District) जिरायती व कायमच दुष्काळी (Drought) टापुतील 182 गावातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी (Water) मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा (Nilwande Dam) प्रस्ताव करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षात धरण बांधून झाले त्यात पाणीही साठविले जात आहे. मात्र कालवे (Canal) नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना शेतीला व पिण्यासाठी पाणी (Drinking Water) मिळाले नसल्याचे वास्तव सत्य आहे. त्यातच चालू वर्षी प्रकल्पासाठी बर्‍यापैकी निधी मिळाला होता. त्यातील मोठा भाग भूसंपादनासाठी खर्च (Costs for Land Acquisition) झाला आहे.

कालव्यांची कामे 60 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होवून पाणी मिळण्याची वाट चातकाप्रमाणे लाभधारक शेतकरी (Farmer) पाहत आहेत. मात्र कालव्यांच्या कामांना वेग नसल्यामुळे पिंपरी निर्मळ शिवारात काम पूर्ण झालेले कालवे वेड्या बाभळीनी वेढले आहेत. विषेश म्हणजे याच भागात आजपर्यंत कालव्यांची प्रथम रोजगार हमी योजनेतून दोनदा यांत्रीकीकरणातून अशी तिनदा कामे झाली आहेत. मात्र कालवे वाहते न झाल्याने या कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे, वेड्या बाभळी उगवल्या आहेत. त्यासाठी पाटबंधारे विभागाला पुन्हा चौथ्यांदा येथे निधी खर्च करून काम करावे लागाणार असल्याचे चित्र आहे.

अंत्य कालव्यांच्या कामाचा वेग मंदावला

पिंपरी निर्मळ शिवारातून सुरू होणार्‍या निळवंडेच्या अंत्य कालव्यांचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामाला फारसा वेग नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने 50 टक्के काम पूर्ण करण्याचा टप्पाही गाठला नाही. पाटबंधारे विभागाकडून चालू वर्षी जून 2022 मध्ये मुख्य कालव्याची चाचणी घेण्याचे धोरण असताना रेंगाळलेले कामे व पूर्ण झालेल्या कालव्यांमध्ये उगवलेल्या वेड्या बाभळीमुळे नवीन समस्या निर्माण होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com