निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळणार - ना. थोरात

निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळणार - ना. थोरात

तळेगाव दिघे (वार्ताहर)

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण, या पद्धतीने निळवंडे धरण पूर्ण केले, निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. कालव्यांची कामे सध्या जलद गतीने सुरू आहेत. निळवंडे धरणाचे पाणी लवकरात लवकर दुष्काळी भागाला मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी महसूलमंत्री थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होत. व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, अॅड. माधवराव कानवडे, थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती मीराताई शेटे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, गणपत सांगळे, साहेबराव गडाख, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर, विष्णुपंत रहाटळ, भारत मुंगसे, भागवत आरोटे, इंजि. सुभाष सांगळे, नामदेव दिघे, अशोक थोरात, एकनाथ मुंगसे, राजेंद्र मुंगसे, पद्माताई थोरात, बेबीताई थोरात, नामदेव आरोटे, राजेंद्र कहांडळ, सरपंच ज्योती मोकळ, बाबासाहेब कांदळकर, अनिल आरोटे, सचिन दिघे, अनिल कांदळकर, अमोल दिघे, अनिल गाजरे, विलास मुंगसे उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल. निळवंडे धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठे बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र मागील भाजप सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर कालव्यांची कामे वेगाने सुरू आहेत.

आमदार डॉ. तांबे म्हणाले. देवकौठे गावाने प्रतिकूलतेवर मात करून अनुकूलता निर्माण केली आहे. या गावातील माणसे अत्यंत चांगली आहेत. गावचा एकोपा असेल तर गावचा किती विकास होऊ शकतो याचा मापदंड म्हणजे देवकौठे आहे. दुष्काळी भागात असूनही मोठे दूध संकलन व अंडे विक्री या ठिकाणी होत आहे. या गावचा आदर्श इतरांनी घ्यावा.

प्रसंगी दुर्गाताई तांबे, भागवत आरोटे, भारत मुंगसे, यांची भाषणे झाली. स्वागत राजेंद्र मुंगसे यांनी केले. प्रसंगी मंत्री थोरात यांच्या हस्ते विकासकामांची उद्घाटने व लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक इंजि. सुभाष सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. एकनाथ मुंगसे यांनी आभार मानले.

इंजि. सांगळेंना संधी द्या

सदर कार्यक्रमात युवक काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे यांना जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती निवडणुकीत संधी द्यावी, अशी अपेक्षा नाशिक मनपाच्या स्थायी समितीचे सदस्य भागवत आरोटे यांनी महसूलमंत्री थोरात यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com