निळवंडेवरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण रद्द करा - गव्हाणे

निळवंडेवरील उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षण रद्द करा - गव्हाणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

अवर्षण गस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर पळविण्याचा व दुष्काळी गावांना दुष्काळाच्या खाईत लोटण्याचे प्रयत्न सुरु केले असून लाभक्षेत्रा बाहेरील 17 गावांच्या उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी 37 लाख रुपयांची आर्थिक तरतूद केल्याचा शासन निर्णय जलसंधारण मंत्री गडाख यांनी घेतला आहे. तो मागे घ्या अन्यथा दुष्काळी शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा कोपरगाव तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे यांनी दिला आहे.

निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रांबाहेरील गावांना उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील 17 गावांसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यते नुसार 02 कोटी 37 लाख 31 हजार 546 रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय नुकताच जलसंधारण मंत्रालयाने घेतला आहे. जलसंधारण मंत्रालयाने प्रकल्पाचे एकूण पाणी आणि त्याचे लाभक्षेत्र यांचा विचार न करता निळवंडे डाव्या-उजव्या कालव्यावरील 17 पाणी उपसा सिंचन योजनांसाठी 03 हजार 900 हेक्टरचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आर्थिक तरतूद केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

या योजनेत शिरपूरचे 89.6 आणि डीग्रसचे 53.05 हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रातील वगळता अन्य सर्व गावे हि लाभ क्षेत्राच्या बाहेरील आहे. तरीही त्यांची नावे या योजनेत आली आहे. संगमनेर तालुक्यातील ही गावे संलग्न असले तरी त्यासाठी पाणी उदभवाची सोय भडांरदर्‍यातून करायला हवी होती. मात्र तसे न करता दुष्काळी गावासाठी राखीव पाणी देऊन प्रस्ताविक गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे. वास्तविक या पाणी योजनांसाठी ज्या धरणात अतिरिक्त पाणी आहे. अशा बारमाही भंडारदरा धरणाची निवड करायला हवी होती. मात्र भंडारदरा धरणाची सिंचन क्षमता केवळ 23 हजार हेक्टर आहे.

तर निळवंडेची सिंचन क्षमता 68 हजार 878 हेक्टरवर जाऊन पोहचले आहे. आता हे आणखी क्षेत्र वाढले तर एकूण सिंचन क्षेत्र जवळपास 71 हजार हे.वर जाऊन पोहचेल. विहिर सिंचन, तुषार सिंचन धरून हा लाभक्षेत्राचा कसाबसा ताळमेळ बसवला आहे. वास्तविक जास्त क्षमता असणार्‍या भंडारदरा धरणाचे पाणी संगमनेर शहर आणि उर्वरित गावे यांना द्यायला हवे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांत मोठी नाराजी पसरली आहे.त्यामुळे जलसंधारण विभागाचा हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. या प्रकल्पाचा आढावा घेऊन वस्तुस्थिती समजुन घेऊन या गावांचा समावेश भंडारदरा या बारमाही धरणावर करावा, अशी मागणीही तालुका उपप्रमुख रंगनाथ गव्हाणे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com