निळवंडे प्रकल्प : भूसंपादन प्रश्‍नी 26 जुलै रोजी अकोलेत बैठक

निळवंडे प्रकल्प : भूसंपादन प्रश्‍नी 26 जुलै रोजी अकोलेत बैठक

अकोले (प्रतिनिधी) / Akole - निळवंडे प्रकल्पातील आणि डाव्या व उजव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनींचे ज्या खातेदारांचे पेमेंट अहमदनगर कोषागारात पडून आहे. त्यांचे पेमेंटचे वाटप सोमवार दि.26 जुलै रोजी अकोले येथे पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. त्यासाठी भूसंपादन अधिकारी स्वतः अकोले येथे येणार असल्याची माहिती पाणी प्रश्‍नांचे अभ्यासक मिनानाथ पांडे यांनी दिली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. हा मोबदला कमी असल्याने सदर पेमेंट आणण्यासाठी कोणीही गेले नव्हते व वारस नोंदी न झाल्यामुळे, तसेच आपसातले वाद किंवा पेमेंटचे अधिकार पत्र एका व्यक्तीला देणे यामुळे हे वाटप राहिले होते. ह्या सर्व प्रक्रिया प्रकल्पग्रस्तांनी अगोदरच तलाठी, मंडलाधिकारी किंवा तहसील कार्यालयात पूर्ण करून घ्याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनास दिली आहे. तसेच 7/12 उतारे दुरुस्ती व भूसंपादनातील चुका याची सुद्धा कार्यवाही होईल.

कालव्यात बाधित होणार्‍या घरांचा व उभ्या पिकांचा मोबदला मंजूर झाला आहे, त्याचे सुद्धा वाटप करण्यासाठी वारस नोंदी व अधिकार पत्र महसूल प्रशासनाकडे करणे गरजेचे आहे. तुटलेल्या पाईप लाईन जोडणेचा मोबदला जलसंपदा विभाग करीत आहे. तसेच दोन्ही कालव्यांवर कोठे कोठे छोटे पूल करायचे आहेत त्याचे मागणी अर्ज ठराव त्वरीत द्यावेत, असे आवाहन श्री. पांडे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com