निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील

निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील

राहाता |प्रतिनिधी| Rahata

निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातील (Left Canal) कामांच्या त्रृटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ही काम पूर्ण होताच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी मागील आठवड्यात जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) अधिकार्‍यांच्या बैठकीत निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन गांभीर्याने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शनिवारी त्यांनी झालेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा (Meeting) घेतल्यानंतर उर्वरीत काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. काम पूर्ण होताच कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे विखे पाटील म्हणाले.

निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील
पाऊस आला पण उशीर झाला...

निळवंडे कालव्यातून प्रथम चाचणीचा शुभारंभ 31 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालवा व त्यावरील शाखा कालव्यांच्या शेवट पर्यंत केवळ 12 दिवसांमध्येच सुमारे 120 कि.मी. लांबीत यशस्वीपणे चाचणी पूर्ण करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते. प्रकल्पाचा डावा कालवा 2 ते 28 कि.मी. हा अकोले तालुक्यातील म्हाळादेवी, मेहंदुरी व कळस या भागातून जातो. हा भाग डोंगराळ असल्यामुळे काही लांबीत एका बाजूला डोंगर (Mountain) व कठीण खडकातील खोदाई व दुसर्‍या बाजूला 14-15 मी. उंचीचे माती भराव करून कालव्याचे काम करण्यात आलेले असल्याने सदर ठिकाणी कालवा खोदकाम करताना कालव्याच्या तळातील खडकास तडे गेले, तसेच काही भागातील खडक सछिद्र व भेगा असलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे, अकोले तालुक्यातील म्हाळादेवी, मेहदुरी व कळसच्या भागामध्ये कालवा तळातील खडकामधील सपामधून गळती होत असल्याचे प्रथम चाचणीच्या वेळी निदर्शनास आले होते.याच कारणामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन (Farmer Movement) केले होते ही बाब प्राधान्याने विचारात घेण्यात आली आहे.

निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील
“अडीच वर्षे घरात बसून, मंत्रालयाची दारे...”; विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल!

कालव्याची दुरूस्ती न करताच पाणी सोडल्यास व पुन्हा पाझर झाल्यास या भागातील शेतकर्‍यांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो. याबाबत अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाला आधीच आंदोलनाचे इशारे देवून ठेवले असल्याची बाब लक्षात घेवून कठीण खडकाच्या भागामध्ये कालवा तळात आणखी खोदाई करून त्यात काळी माती भरणे. मोठ्या भरावाच्या ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे अशा प्रकारच्या गळती प्रतिबंधक उपाय योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना मंत्री विखे यांनी दिल्या आहेत. अकोले (Akole) तालुक्यात पावसामुळे काळी माती उपलब्ध होण्यास व कॉक्रीटचे काम शीघ्रगतीने करण्यास अडचण निर्माण होत असल्याने सदरील कामे लवकर पूर्ण करण्याची ग्वाही अधिकार्यांनी दिली असल्याचे सांगतानाच पावसाने उघडीप दिल्यास उपरोक्त कामे पूर्ण करून, क्रॉस रेग्युलेटर व रिटेनिंग वॉलचे काम सुरक्षित पातळी पर्यंत आणून आवश्यकता भासल्यास मोठी गळती असलेल्या भागात प्लास्टिक कागदाचा वापर करण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांना विखे पाटील यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील
श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्यात दुधाची तपासणी
निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार - ना. विखे पाटील
खा. विखेंकडून एमआयडीसी भूसंपादनाचा आढावा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com