निळवंडे
निळवंडे
सार्वमत

निळवंडे कालव्याचा विषय तातडीने संपवा

महसूलमंत्री ना. थोरात : खंडकर्‍यांच्या विषयावरही चर्चा

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

निळवंडे कालव्याच्या भूसंपादनाचा विषय तातडीने संपवून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे पुनर्वसन करावयाचे आहे. यामुळे हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. तसेच आज निळवंडे संदर्भात संगमनेरमध्ये संगमेनर आणि अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नाशिक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक ना. थोरात यांनी बोलावली आहे.

शुक्रवारी नगरला सायंकाळी महसूलमंत्री निळवंडे यासह अन्य विषयांवर आढावा बैठक बोलावली होती. यावेळी आ. डॉ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पिराजी चोरमारे, निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता शिंगाडे, भूमिलेख विभागाचे अधीक्षक अभियंता शिंदे आणि महसूल विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूलमंत्री ना. थोरात यांनी जिल्ह्यातील खंडकर्‍यांच्या विषयाचा आढावा घेताना किती खंडकर्‍यांना जमीन देणे बाकी आहे. महामंडळाच्या किती जमिनीची मोजणी होणे शिल्लक आहे. खंडकर्‍यांचे कोणते प्रश्न आहेत. ज्या खंडकर्‍यांना जमीन मिळाली, पण त्यांना ती मान्य आहे की नाही, असे काही विषय आहेत?, खंडकर्‍यांच्या काही व्यक्तीगत अडचणी आहेत? फाळणी बारा झालेला आहे.

खंडकर्‍यांना दिलेल्या जमीनीची मोजणीसोबत त्यांची चतूरसीमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत ? याची सविस्तर माहिती घेतली. जो पर्यंत खंडकर्‍यांच्या नावाचा सातबारा तयार होत नाही, तो पर्यत हा विषय संपणार नसल्याचे त्यांनी सांगत हा विषय लवकरात लवकर संपविण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या.

तसेच निळवंड प्रश्नावर बोलातांना कालव्यासाठी आवश्यक असणार्‍या जमीनीची भूसंपादन झाले का? प्रकल्नग्रस्त शेतकर्‍यांचे पुनर्वसनाचे काय? याबाबत प्राथमिक चर्चा केल्यानंतर आज या विषयावर संगमनेरला स्वतंत्र बैठक बोलावली आहे. यावेळी जलसंपदा विभागचे मुख्य अभियंता यासह विभागीय पातळीवरील अधिकार्‍यांना बोलविण्यात आले आहे.

यावेळी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून या विषयावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सुत्रांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com