निळवंडे कालव्याला निधी कमी पडू देणार नाही - ना. पाटील

कानडगाव येथे कालव्याच्या कामांची पाहणी
निळवंडे कालव्याला निधी कमी पडू देणार नाही - ना. पाटील

कानडगाव/ राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असून या कामासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडू देणार नसल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

काल राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे ना. जयंत पाटील, ना.प्राजक्त तनपुरे व मा.खा.प्रसाद तनपुरे यांनी भेट देऊन तेथील कालव्याच्या स्लॅब कलर्वट व माती भराव कामांची पाहणी करून आढावा घेतला. ना. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात यावर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद या कालव्यासाठी केलेली आहे. या कालव्यांचे काम डिसेंबर 2022 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

याकामामुळे कालव्यात पाणी येऊन या जिरायत भागातील शेती समृध्द होऊन येथील परिसर सुजलाम् सुफलाम् होणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. यावेळी कणगर येथील भागडा चारी देखभाल दुरुस्तीसाठी येथील लाभधारक शेतकरी सुयोग नालकर, अनिल घाडगे, सोन्याबापू उर्‍हे, दादासाहेब पवार, किशोर गागरे यांनी 1 कोटी 50 लाख निधीची मागणी ना. पाटील यांच्याकडे केली. यावर ना. पाटील यांनी या प्रस्तावाबाबत औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळ अधिकार्‍यांशी त्वरीत संपर्क करून हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याची सूचना दिली असल्याचे सांगितले. प्रस्ताव प्राप्त होताच निधी त्वरीत मंजूर करण्यात येईल, असे यावेळी आश्वासित केले.

यावेळी उर्ध्व प्रवरा पाटबंधारे विभागातील अधिकारी तसेच जि.प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव, अमोल जाधव, अ‍ॅड.अभिषेक भगत, परिसरातील लाभधारक शेतकरी सोपान हिरगळ, बापूसाहेब गागरे, राजू सिनारे, संदिप गागरे, अनिल शिरसाठ, डॉ.रवींद्र गागरे, विनोद मुसमाडे, तुकाराम गागरे, मंगेश गाडे, जालिंदर मुसमाडे, सागर मुसमाडे, पांडुरंग गाडे, सुधीर गावडे, जाविद सय्यद, रवींद्र संसारे, सुुयोग नालकर, हरिभाऊ लोंढे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com