निळवंडेतुन उद्या शेतीचे आवर्तन सोडणार

Nilwande
Nilwande

अकोले |प्रतिनिधी| Akole

भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी उन्हाळी हंगामातील शेतीचे दुसरे आवर्तन उद्या बुधवारी सकाळी 10 वा निळवंडे धरणातून 1 हजार 450 क्युसेक्स विसर्गाने सोडण्यात येणार आहे. अशी माहिती जलसंपदा चे सहाय्यक कार्यकारी अभियंता गणेश हारदे यांनी "सार्वमत "शी बोलताना दिली.

काल दि. 27 एप्रिल अखेर भंडारदरा धरणात 6 हजार 257 दलघफू तर निळवंडे धरणात 3 हजार 870 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता .

हे आवर्तन साधारणत २० ते २५ दिवस सुरू राहील. या आवर्तनात अंदाजे ३००० ते ३२०० दलघफू पाणी वापर होईल असा अंदाज असल्याचे भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com