निळवंडे धरण भरण्याच्या मार्गावर, प्रवरा पात्रात पाणी सोडले

निळवंडे धरण भरण्याच्या मार्गावर, प्रवरा पात्रात पाणी सोडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले | प्रतिनिधी

भंडारदरा धरणापाठोपाठ (Bhandardara Dam) निळवंडे धरणही (Nilwande Dam) भरण्याच्या मार्गावर आहे. आज सोमवारी निळवंडे धरणातून दुपारी दोन वाजेच्या सुमारास...

3 हजार 360 क्यूसेकने तर तीन वाजता त्यात वाढ करून 6065 क्युसेक विसर्ग प्रवरा पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा नदी (Pravara River) पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना (Pravara riverside villages) सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाच्यावतीने (Department of Water Resources) देण्यात आला आहे. (Nilwande Dam Water Update)

निळवंडे धरण भरण्याच्या मार्गावर, प्रवरा पात्रात पाणी सोडले
पत्नी माहेरी गेलेली, घरी पतीची गळफास घेवून आत्महत्या

मागील पाच दिवसांपासून भंडारदरा (Bhandardara) व निळवंडे (Nilwande) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरण ओव्हरफलो झाले. त्यामुळे भंडारदरा धरणातुन (Bhandardara Dam) 4 हजार 400 क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हा विसर्ग वाढत जात तो आज सोमवारी सकाळी 7 हजार 500 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला.

भंडारदरा धरणातून (Bhandardara Dam) येणारे मोठ्या प्रमाणावरील पाणी आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रातील पाणी निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात साठत होते. यामुळे निळवंडे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली आणि दुपारी दीड वाजेच्या सुमारास धरणातील पाणी साठा 93 टक्क्यांपर्यंत पोहचला आणि धरणावरील वक्र दरवाजातून 2675.35 क्यूसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 685 क्यूसेक असे एकूण 3360.35 क्यूसेकने प्रवरा पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी

निळवंडे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली व तो सुमारे 7778 द.ल.घ.फुट म्हणजे 93.40% टक्के वर जाऊन पोहचला. सद्यस्थितीत निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात एकूण 6065 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com