निळवंडे तुडूंब !

निळवंडे
निळवंडे

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्या पाठोपाठ आता आज-उद्या 8320 दलघफू क्षमतेचे धरण निळवंडे धरणही आज 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 8270 दलघफू (99.31) पाणीसाठा होता.

गत आठवड्यात भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेत जोरदार आवक होत होती. हे धरण 94 टक्के भरले. पण पाऊस सुरू असल्याने या धरणातील पाणीपातळी कायम ठेऊन निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाऊस कमी झाला. पण भंडारदरातून विद्युत गृह क्रमांक एक मधून 816 क्युसेक व वाकीचा ओव्हरफ्लो 98 क्युसेक पाणी निळवंडेत जमा होत आहे.

आढळा कालवा चारी दुरूस्तीसाठी 4 कोटी 88 लाख

भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा खोर्‍यातील आढळा मध्यम प्रकल्पाच्या आढळा उजवा कालवा वितरीका क्रं.1 व वितरीका क्रं.1 वरील चारी क्रं. 1,2,3,4 च्या पुर्नस्थापना व नुतनीकरण कामास एकूण 4 कोटी 87 लाख 90 हजार 568 रूपयांच्या प्रस्तावास अटींवर प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाने दिली आहे. या निधीतून विमोचने, फॉल्स, प्रवाहमापन यंत्रे, गावरस्ता पूल या बांधकामाची दुरूस्ती तसेच पोहोच रस्ते व पाणी वापर संस्था स्तरीय कामे मार्गी लागणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com