भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडले

पाणलोटात पावसाचा जोर वाढला
भंडारदरा-निळवंडेतून पाणी सोडले
निळवंडे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले, भंडारदरा(प्रतिनिधी)- काल मंगळवारी दुपारी 4 वाजेनंतर पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने काल सायंकाळी 7 वाजता 2034 क्युसेकने तर रात्री 4396 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. निळवंडेतून प्रवरा नदीपात्रात 4753 क्युसेकने तर तो विसर्ग रात्री 11 वा. 6339 क्युसेक पर्यंत पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही धरणें 100 टक्के भरलेली आहेत.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले.निळवंडे धरणातून 4 हजार 753 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाची तीव्रता वाढल्यास विसर्गात वाढ केली जाईल अशी माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.

भंडारदरा व निळवंडे दोन्हीही धरणे भरलेली आहेत,त्यामुळे धरणात जमा होणारे सर्व पाणी सोडून देण्यात येते.पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा धरणातून स्पील वे मधून 1218 क्यूसेक तर वीज केंद्रातून 816 असा एकूण 2034 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला .तर निळवंडे धरणातून स्पील वे मधून 4103 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 650 क्युसेक असा एकूण 4 753 क्युसेक विसर्ग प्रवरा पात्रात सायंकाळी सुरू होता.पावसाचा जोर वाढल्यास रात्रीतून त्यात वाढ होऊ शकेल.

चार दिवसांपासून पाणलोटात पाऊस थांबल्याने धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. पण काल दुपारपासून पुन्हा पावसास सुरूवात झाली. त्यात पावसाचा जोर वाढलां पाण्याची आवक वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनईत पावसाचा जोर वाढल्याने रात्रीतून मुळा नदीचे पाणी वाढणार आहे. त्यामुळे आज मुळा धरणात आवक वाढणार असल्याने या धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.