निळवंडे धरणातून पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडले

निळवंडे धरणातून पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडले
निळवंडे

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे धरणातून (Nilwande Dam) रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिण्याचे पाण्याचे दुसरे आवर्तन (Second Rotation of drinking water) आज गुरुवारी सकाळी 7 वाजता 1300 क्युसेकने प्रवरा पात्रात सोडण्यात आले आहे.

भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले आहे कि- आज निळवंडे धरणातून (Nilwande Dam) 1300 क्युसेकने पाणी सोडण्यात आले . हे आवर्तन भंडारदरा प्रकल्पाच्या (Bhandardara Project) लाभक्षेत्रासाठी बिगर सिंचन /पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आले आहे. या आवर्तन काळात 300 ते 350 दलघफू पाणीवापर होण्याची शक्यता आहे. अंदाजे 4 ते 5 दिवस हे आवर्तन सुरु राहणार आहे.

तर पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात (Bhandardara Dam) 11039 द.ल.घ.फु व निळवंडे धरणात 8009 द.ल.घ.फु.साठा शिल्लक होता. दरम्यान आज सोडलेले अकोले (Akole) पास करून संगमनेरकडे (Sangamner) सायंकाळी रवाना झाले आहे. उद्या सायंपर्यंत ओझर बंधाऱ्या पर्यंत हे पाणी पोहचेल. तेथून पुढे कालव्या द्वारे श्रीरामपूरपर्यंत (Shrirampur) पाणी पोहचेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com