निळवंडे धरणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक संपन्न

निळवंडे धरणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक संपन्न

नेवासा |तालुका प्रतिनिधीl Newasa

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खा. प्रसादराव तनपुरे, आमदार किरण लहामटे आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार या प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही.

सर्व अभियंत्यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कामाची गती कमी न करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com