निळवंडे धरण 80 टक्के भरले

मुळा पाणलोटातही पाऊस
निळवंडे धरण 80 टक्के भरले
निळवंडे

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण परिसरात गत दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढल्याने 8330 दलघफू क्षमतेचे धरण काल गुरूवारी रात्री उशीरा 80 टक्के भरले.

निळवंडे धरण काल सकाळी 6538 (78.58) टक्के झाले होते. त्यात वाढ होऊन सायंकाळी पाणीसाठा 6566 (79 टक्के) झाला होता. भंडारदरात काल दिवसभर पाऊस सुरू होता. दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 11 मिमी झाली आहे. वाकी तलावातून 556 क्युसेक तसेच अन्य पाणी निळवंडेत दाखल होत आहे. आज शुक्रवारी हे धरण 80 टक्के भरणार आहे.

भंडारदरा पाणलोटातही काल पाऊस कोसळत होता. त्यामुळे गत 36 तासांत धरणात 248 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी 9757 दलघफू पाणीसाठा झाला होता.

मुळा पाणलोटात बुधवारच्या तुलनेत गुरूवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. त्यामुळे मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 1200 क्युसेकवर पोहचला होता. गत 24 तासांत धरणात नव्याने 201 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने पाणीसाठा 20900 दलघफूच्या पुढे सरकला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com