निळवंडेच्या अस्तरीकरणासाठी 2 हजार कोटींचे नियोजन करा - तनपुरे

निळवंडेच्या अस्तरीकरणासाठी 2 हजार कोटींचे नियोजन करा - तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) दोन्ही कालव्यांच्या (canals) अस्तरीकरणासाठी 2 हजार कोटी रुपये खर्चाचे नियोजन (Expenses Planning) करण्याची मागणी (Demand) माजी खासदार प्रसाद तनपुरे (Former MP Prasad Tanpure) यांनी केली आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांना पाठविलेल्या निवेदनात तनपुरे (Tanpure) यांनी म्हटले, निळवंडे धरणाच्या कालव्यांचे (Nilwande Dam Canals) काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केलेले असून यासाठी आपण वेळोवेळी निधीही (Fund) उपलब्ध करीत आहेत. सध्या धरणाच्या (Dam) उजव्या व डाव्या कालव्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. एकूण 8.32 द.ल.घ.फूट क्षमतेच्या या धरणाच्या डाव्या कालव्याची लांबी 85 किमी. तर उजव्या कालव्याची लांबी 97 किमी. आहे.

हे दोन्हीही कालवे माती व मुरूम भरावाचे असून एवढ्या लांबच्या अंतरावरून पाण्याचे वहन होणार असल्याने यामधून झिरपा व बाष्पीभवन मोठया प्रमाणावर होऊन सुमारे 30 ते 40 टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे. यामुळे शेवटच्या भागात उन्हाळी हंगामात पाणी पोहोचविणे अवघड होणार आहे. यासाठी या दोन्हीही कालव्यांना सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये अपेक्षीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com