निळवंडे कालव्याच्या कामावरील ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

निळवंडे कालव्याच्या कामावरील ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारात निळवंडे उजव्या कालव्याचे जोरदार काम सुरु आहे. कामावरील ट्रॅक्टर उलटल्याने चालक विजय विनायक कदम (वय 25) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास कद -मुंढे वस्तीनजीक घडली.

विजय विनायक कदम हा तरुण मागील काही दिवसांपासून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. कामावरील साहित्य तसेच मजूंराची तो ने - आण करण्याचे काम करत असे. सोमवारी आश्वी बुद्रक येथिल आठवडे बाजारासाठी तो मंजूराना ट्रॅक्टर मधून घेऊन गेला होता. रात्री उशीरा 9.30 वाजेच्या सुमारास मंजूराना पिप्रीं - लौकी येथे सोडल्यानंतर पानोडी येथिल आपल्या घराकडे विजय टॅक्टर घेऊन चालला होता. कदम - मुंढे वस्तीनजीक वळणावर टॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्याखाली विजय दबला गेला होता. या रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍याची वर्दळ कमी असल्यामुळे विजयला मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान समजलेल्या माहितीनुसार विजयच्या घरची परिस्थिती गरिबीची असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण व चुलते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे पानोडीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. तर आश्वी पोलिसांशी संपर्क केला असता याबाबत काहीही दाखल नसल्याची माहिती मिळाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com