निळवंडे कालव्यांसाठी 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर
File Photo

निळवंडे कालव्यांसाठी 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकताच 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तो निधी नुकताच खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहिती माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी दिली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील भूसंपादनात 341 कोटी रुपये खर्च झाल्याने फार थोडा निधी कामासाठी शिल्लक होता. ठेकेदारांचे 60 कोटी रुपयांचे देणे थकले होते व प्रकल्पाच्या ठेकेदारांनी केलेल्या कालव्यांच्या कामाची प्रलंबित देणी व उर्वरित मुख्य कालव्यांसाठी 600 कोटी तर वितरिकांसाठी 800 कोटी असे एकूण 01 हजार 400 कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता होती. त्यासाठी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले, सोन्याबापू उर्‍हे सर यांनी याबाबत माजी खा.प्रसाद तनपुरे यांची भेट घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री यांना निवेदन दिले होते. त्यावर ही तरतूद झाली आहे.

निळवंडे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांचे काम जवळपास 30 टक्के तर वितरिकांचे पूर्ण काम बाकी आहे. निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अ‍ॅड.अजित काळे यांचे मार्फत जनहित याचिका दाखल करून न्याय मागीतला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले होते.तो पासून काम विना अडथळा सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी सरकारने कालवा कृती समितीने माजी खा.प्रसाद तनपुरे व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार 491 कोटींची आर्थिक तरतूद केली होती.

मात्र हा निधी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी व निळवंडे येथील भूसंपादनात 341 कोटी रुपये खर्च झाल्याने फार थोडा निधी कामासाठी शिल्लक होता. त्यामुळे निधीची पुन्हा एकवार चणचण निर्माण झाली होती व ठेकेदारांचे सुमारे 60 कोटी रुपयांचे देणे थकले होते व प्रकल्पाच्या ठेकेदारांनी केलेल्या कालव्यांच्या कामाची प्रलंबित देणी व उर्वरित मुख्य कालव्यांसाठी 600 कोटी तर वितरिकांसाठी 800 कोटी असे एकूण 01 हजार 400 कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता होती.त्यासाठी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे व अध्यक्ष रुपेंद्र काले, सोन्याबापू उर्‍हे यांनी याबाबत माजी खा.प्रसाद तनपुरे यांची राहुरी येथे भेटून राज्याचे जलसंपदा मंत्री यांना निवेदन दिले होते व निधीची तातडीने 01 हजार 400 कोटींची मागणी केली होती.त्यानुसार ही 190 कोटींची तरतूद झाली आहे. त्याला जलसंपदाचे प्रभारी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी दुजोरा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com