निळवंडे कालव्यांची कामे मार्गी लावतांनाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा

शेतकर्‍यांची मागणी
निळवंडे कालव्यांची कामे मार्गी लावतांनाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा

अकोले |प्रतिनिधी| Akole

निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करीत असतानाच कालवेग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्नही मार्गी लावा, वेळोवेळी प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्त शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, अशी मागणी अकोले तालुक्यातील कालवेग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील आढळा नदीवरील आढळा सेतू पुलाच्या कामाची शनिवारी पाहणी केली. यावेळी निळवंडे कालव्यांच्या कामाचा आढावा घेऊन निळवंडे कालवा प्रकल्पांचे काम ऑक्टोबर 2022 पर्यंत मार्गी लावून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे, हि अतिशय आनंदाची बाब आहे.

वास्तविक ज्या तत्परतेने महसूल मंत्री व जलसंपदा मंत्री व ऊर्जा राज्यमंत्री हे निळवंडेच्या कामाला गती देत आहे. यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे मात्र ज्या शेतकरी यांच्या जमिनी पाटात व धरणात गेल्या आहेत. त्यांचे प्रश्न तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे. आतापर्यंत शासनाने या शेतकरी यांच्या उर्वरित प्रश्नाकडे तितक्या गांभीर्याने लक्ष वेधल्याचे दिसून येत नाही. कामापुरती प्रश्नाची सोडवणूक सुरू आहे. जसे की तुटलेल्या पाईपलाईन ची भरपाई, पिकांचे झालेले नुकसान या व्यतिरिक्त ज्या बाबी विचाराधिन होत्या.

त्यांना अद्यापही गती मिळाली नाही. पूरग्रस्त शेतकरी यांचे जमिनी पाटात गेल्याने भूमीहीन होत आहे. तर काही शेतकरी यांचे घरे, जनावरांचे गोठे निकषात बसत नसल्याने त्यांना वार्‍यावर सोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यावर एक वेळची विशेष बाब म्हणून अशा शेतकरी यांना घरे व गोठे व त्या जमिनीचा मोबदला द्यायला पाहिजे तसेच कालवेग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना शासकीय तथा निमशासकिय संस्थांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आता पर्यंत वेगवेगळ्या पातळीवर बैठका व चर्चा झाल्या मात्र मार्ग काढल्याचे दिसून येत नाही.

या कामी संघर्ष समितीने अकोले तालुक्यातील शेतकरी यांचे बरोबर रहावे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या आनंदात अकोलेतील प्रकल्पग्रस्त व कालवे ग्रस्त शेतकरी नक्कीच सामील होतील. शासन स्तरावर आता पर्यंत झालेल्या बैठका व त्यात दिलेल्या आश्वासनाची पुर्तता तातडीने पर्ण करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व कालवे ग्रस्त शेतकरी खंडु वाकचौरे, बाळासाहेब वाळुंज, बाळासाहेब घोडके, संतोष तिकांडे, पांडुरंग चासकर, हनुमंता वाळके, भाऊसाहेब मोरे, गणेश शेटे, भरत पुंडे, गणेश वावळे, उत्तम पवार, रोहिदास वैष्णव, अनिल वाळके, पंढरीनाथ तिकांडे आदिंनी केली आहे.

अकोले तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व कालवे ग्रस्त शेतकरी यांनी सहकार्याची भुमिका घेऊन काम पूर्णत्वाकडे नेण्यास सहकार्य केले आहे.त्या प्रमाणे संगमनेर, राहाता, कोपरगाव येथील पाटपाणी संघर्ष समीतीने अकोले तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व कालवे ग्रस्त शेतकरी यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भुमिका अकोलेतील शेतकर्‍यांनी घेतली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com