निळवंडे कालव्यांच्या कामाला गती द्या निळवंडे पाटपाणी समितीची मागणी

निळवंडे कालव्यांच्या कामाला गती द्या निळवंडे पाटपाणी समितीची मागणी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला गती मिळुन येत्या डिसेंबर मध्ये मुख्य कालव्याची चाचणी व्हावी तसेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील नगर-मनमाड हायवेच्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या सदस्यांनी गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. बेलसरे यांच्याकडे केली आहे.

गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी श्री.बेलसरे यांची नियुक्ती झाली असून त्यांचा सत्कार यावेळी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या सदस्यांनी केला.तसेच निळवंडेचे रखडलेल्या कांमाना गती मिळावी. जलसंपदाच्या नियोजनाप्रमाणे डिसेंबर मध्ये मुख्य कालव्याची चाचणी व्हावी तसेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारातील नगर-मनमाड हायवेच्या पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. या मागण्याचें निवेदन यावेळी श्री.बेलसरे यांना दिले. यावेळी समितीचे नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, विठ्ठलराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com